करचलना संदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

Home » Blogs » करचलना संदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या?

Table of Contents

ओळख

उद्योग आणि वित्त जगतात, व्यवसायाच्या नोंदी राखणे, करनियमांचे पालन, महत्त्वाचे असतेच पण कर दायित्वाचे व्यवस्थापनाचाही त्यात अपवाद नाही. करचलन तयार करताना काळजीपूर्वक आणि आवश्यक ती सर्व माहिती समाविष्ट असल्याची खात्री करून तयार करावे लागते. शिवाय त्यासाठीच्या कागदपत्रांच्या उपलब्धतेची खात्रीही करावी लागते.

त्याशिवाय, करचलनासाठीच्या महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम तारखेची मुदत पाळणेही आवश्यक आहे.  यातल्या अपयशाचे दंड आणि कायदेशीर परिणाम होऊ शकतात. या लेखामध्ये करचलन जारी करण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा ज्या सामान्य नागरिक आणि आस्थापना यांना करदेयके पाठवताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कार्यक्षम आणि कायदेशीर देयक प्रक्रियेसाठी ही अंतिम तारखेची मुदत लक्षात घेणे आणि तिचे पालन गरजेचे आहे. 

करचलन जारी करण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या तारखा

व्यवसायाच्या क्षेत्रात लागू होणाऱ्या करकायद्यानुसार, करचलन भरणा करण्याच्या अंतिम मुदतीत कदाचित बदल होऊ शकतो. त्यासाठी प्रमाणित मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:

  • पुरवठा तारीख:  ही सर्वात महत्त्वाची तारीख आहे. विविध कर व्यवस्थांमध्ये करचलन या तारखेआधी किंवा तारखेला पाठवले पाहिजे. बहुतांश ठिकाणी, ज्या दिवशी उत्पादन किंवा सेवा ग्राहकाला वितरीत केली जाईल किंवा त्यांना उपलब्ध करून दिली जाते ती पुरवठा तारीख असते. 
  • देयरक्कम तारीख: काही करअधिकारी, वस्तू किंवा सेवा वितरण होण्यापुर्वी व्यवसायाला देयरक्कम मिळवण्यापुर्वी, देयकाच्या दिवशी चलन जारी करण्याची परवानगी देतात. कदाचित हे सर्व उद्योग किंवा कायदेशीर व्यवस्थाप्रणालींना लागू होऊ शकणार नाही.
  • देयक कालावधी: काही प्रसंगांमध्ये, देयके नियमितपणे जसे मासिक किंवा पंधरवड्याला  पाठवली जाऊ शकतात, विशेषतः ज्या आस्थापना सेवा किंवा सदस्यत्व कायम ठेवणार असतात त्यांना हे लागू होऊ शकते. संपूर्ण देयक कालावधीत झालेले व्यवहार चलनामध्ये अंतर्भूत करावे लागतील.
  • कर कालावधी: तुमच्या आस्थापनेचा करकालावधी दिनदर्शिकेपेक्षा वेगळा असल्यास, तो कर कालावधी जुळवून घेण्यासाठी प्रत्येक कर कालावधीच्या शेवटी तुम्हा करचलन पाठवू शकता.
  • कंत्राटी करार: काही परिस्थितीत, चलन पाठवल्यानंतर आस्थापना आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील कंत्राटी कराराचे नियंत्रण होते. या करारामध्ये काही विशिष्ट सूचना अंतर्भूत असल्यास त्याचे निरीक्षण करा.
  • वाढीव कालावधी: काही कर अधिकारातून पुरवठ्याच्या तारखेनंतर मिळालेल्या वाढीव कालावधीमध्ये तुम्ही करचलन जारी करू शकता. आस्थापनेला विविध व्यवहार एकाच चलनामध्ये अंतर्भूत करता यावे यासाठी हे वारंवार वापरले जाते.

चलन जारी करण्यासाठी तुम्ही अचूक तारखेचे पालन करत आहात याची खात्री करण्यासाठी, तुमच्या स्थानिक कर अधिकाऱ्याने पाठवलेले विशिष्ट करत नियम आणि सूचना लक्षात घ्या किंवा कर तज्ज्ञाकडून सल्ला घ्या. या अंतिम तारखांचे पालन चुकल्यास दंड किंवा कर समस्या उद्भवू शकतात. 

वार्षिक उलाढाल आणि चलन अहवालाची नवी कालमर्यादा

GST प्राधिकरणाने एक महत्त्वाची सुधारणा अंमलात आणली आहे ज्याचा थेट करदात्यांवर प्रभाव टाकणार आहे, विशेषतः ज्यांची एकूण वार्षिक उलाढाल (एएटीओ) किमान १०० कोटी रुपये आहे  या गटातल्या करदात्यांना १ नोव्हेंबर २०२३ पासून चलनाच्या तारखेपासून चलन भरणा करण्यासाठी तीस दिवसांचा कालावधी असेल. या सल्ल्याचा हेतू हा अलीकडे करण्यात आलेला हा बदल आणि त्याचा करदात्यांवर होणारा परिणाम यावर प्रकाश टाकणे हा आहे.

  • एएटीओ (AATO): ज्या करदात्यांची वार्षिक उलाढाल 100 कोटी किंवा त्याहून अधिक आहे त्यांनी देयक भरणा करण्यासाठी नवीन मुदत लक्षात घ्यावी. याचा अर्थ असा की ज्या आस्थापनां या मर्यादेपेक्षा कमी अर्थाजन करतील त्यांच्यावर या मर्यादेचा परिणाम होणार नाही.
  • अहवालासाठी 30 दिवस कालावधीः नव्या सुधारणेप्रमाणे, वार्षिक उलाढालीचा निकष पूर्ण करणाऱ्या करदात्यांना चलनाच्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत सर्व देयके नोंदवणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व संबंधित दस्तऐवज जसे चलने, क्रेडिट नोट्स्, डेबिट नोटस् आणि इतर दस्तऐवज ज्यांचे चलन रेफरन्स क्रमांक काढलेले आहेत  यांचा समावेश होतो.
  • कडक अंमलबजावणीः करदात्यांसाठी अंतिम मुदतीचे पालन करण्याविषयी जागरूक असणे महत्त्वाचे आहे. व्यावहारिकदृष्ट्या, 1 नोव्हेंबर 2023 ला चलन जारी केले आहे तर उदाहरणार्थ ते 30 नोव्हेंबर 2023 ला नोंदवले जाऊ शकत नाही. अंतिम मुदतीचे पालन न केल्यास दंड आणि गैरशिस्तीच्या समस्या उद्भवू शकतात. 
  • अंमलबजावणीची तारीखः 1 नोव्हेंबर 2023 पासून ही नवी वैधता तपासणी लागू होईल. या तारखेपर्यंत एएटीओ अर्थात वार्षिक उलाढालीच्या निकष पूर्ण करणाऱ्या करदात्यांकडून सर्व चलने आणि त्यासोबतचे दस्तऐवज 30 दिवसांच्या आत कळवले जाणे आवश्यक आहे.

Also Read: The Importance Of Including All Required Elements On A Tax Invoice

करचलनासाठी आगामी महत्त्वाच्या तारखा

captainbiz करचलनासाठी आगामी महत्त्वाच्या तारखा

स्रोत

करचलन जारी करण्यासाठी खाली काही आगामी महत्त्वाच्या तारखा दिल्या आहेत.

दिनांक महत्त्वपूर्ण बाब
नोव्हेंबर 7, 2023 ऑक्टोबर महिन्यात कापलेला किंवा गोळा केलेले कर जमा करण्याची अंतिम तारीख जवळ आहे. एवढेच नव्हे तर, जरी करचलन जारी केले नसले तरीही सरकारी कार्यालयाने कापलेले किंवा गोळा केलेले सर्व पैसे सुद्धा कर भरण्याच्या दिवशी केंद्र सरकारकडे जमा करणे आवश्यक आहे.
नोव्हेंबर 14, 2023 कलम 194-IA अंतर्गत कपात केलेल्या करांसाठीचे टीडीएस प्रमाणप्रत्र मिळवण्याची अंतिम मुदत

कलम 194-IB अंतर्गत कपात केलेल्या करांसाठी TDS प्रमाणपत्र जारी करण्याची अंतिम मुदत.

 

कलम 194M अंतर्गत कपात केलेल्या करांसाठी TDS प्रमाणपत्र जारी करण्याची अंतिम मुदत.

 

कलम 194S अंतर्गत कपात केलेल्या करांसाठी TDS प्रमाणपत्र जारी करण्याची अंतिम मुदत.

नोव्हेंबर 15, 2023 (पगाराव्यतिरिक्त मिळालेल्या इतर रकमेसाठी झालेल्या करकपातीबाबत) 30 सप्टेंबर 2023, दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी संपणार्‍या तिमाहीसाठी तिमाही टीडीएस प्रमाणपत्र मिळवणे

 

 चालान सादर केल्याशिवाय ऑक्टोबर 2023 साठी TDS/TCS भरले असल्यास सरकारी संस्थेने फॉर्म 24G सादर करणे आवश्यक आहे.

 

ऑक्टोबर 2023 महिन्यासाठी प्रणालीत नोंदणीनंतर ग्राहक कोड बदलला असल्यास त्यानंतरच्या व्यवहारांबद्दल फॉर्म क्रमांक 3BB मध्ये विवरण प्रदान करण्यासाठी स्टॉक एक्सचेंजला दिलेली अंतिम मुदत

नोव्हेंबर 30, 2023 कलम 194-IA अंतर्गत कपात केलेल्या करासाठी चलनासह विवरणपत्र प्रदान करण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2023 दिली आहे.

 

कलम 194-IB अंतर्गत रोखलेल्या करावरील चलनासह विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर 2023 दिली आहे.

 

कलम 194M अंतर्गत रोखलेल्या करावरील चलन-सह-विवरण सादर करण्याची ऑक्टोबर 2023 अंतिम मुदत दिली आहे.

Also Read: How Can I Ensure That I Issue Tax Invoices On Time?

लघु व्यवसायांसाठी करचलन पाठवण्याची कालमर्यादा

करकायद्याचे पालन करण्याची हमी देताना, लहान आस्थापना, करचलन पाठवतेवेळी सर्वसाधारणपणे तारखा आणि निकष यांचे पालन करतात. लहान आस्थापनांनी सर्वसाधारणपणे, त्यांची करचलने पुरवठ्याच्या तारखांवर आधारित ठेवली पाहिजेत. म्हणजे ज्या दिवशी ग्राहकांना उत्पादन किंवा सेवा पुरवली गेली किंवा उपलब्ध करून दिली जाते.  कर नियमांचे पालन करण्यासाठी, तारखेप्रमाणे चलन भरणे अत्यावश्यक आहे. 

अधिकार आणि आस्थापनांच्या पद्धतीनुसार यात कदाचित बदल होऊ शकतो, देयकाच्या दिवशी चलन पाठवले जाऊ शकते, विशेषतः जेव्हा देयरक्कम माल किंवा सेवा पुरवठ्याच्या आधी पूर्ण दिली जाणार आहे. जर तुम्ही त्रैमासिक किंवा वार्षिक अशा वेगळ्या मुदतींसह तुमचा छोटा व्यवसाय चालवत असाल तर कर कालावधीसह चलने काढावीत. 

त्याहीपुढे जाऊन, लहान व्यवसाय जे सदस्यता सेवा किंवा आवर्ती सेवा प्रदान करतात ते नियमितपणे देयक कालावधीत झालेल्या व्यवहारांसाठी, उदाहरणार्थ,  महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून एकदा ग्राहकाला देयक देण्याची निवड करू शकतात. ग्राहकांसह कोणत्याही प्रकारच्या कंत्राटी कर्तव्यांचे पालन करणे देखील महत्त्वाचे आहे कारण यामध्ये चलने जारी करण्याच्या मुदतीचा समावेश असू शकतो. 

Also Read: Importance And Benefits Of GST Tax Invoice For Small Businesses

करचलन पाठवण्याची निर्यातकांसाठीची कालमर्यादा

करचलने पाठवताना निर्यातकांना निर्यातक देशाच्या विशिष्ट कर नियामक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा दोन्हींची माहिती घ्यावी लागते. निर्यातकांना ज्या वस्तू किंवा सेवा ग्राहकाला त्वरीत वितरीत केल्या जातात किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातात त्या पुरवठ्याच्या तारखांवर आधारित करचलनाचा पुरवठा करावा लागतो. सीमापार व्यवहारांसाठी कर आणि शुल्क हे या तारखांनुसार आकारल्या जातात आणि निर्यातकांसाठी ते महत्त्वाचे आहे. 

आर्थिक व्यापारात, शक्य तितक्या लवकर चलने देणे गरजेचे असते,  शक्यतो पुरवठ्याच्या दिवशी किंवा त्या आधी, कारण त्यासाठीचा विलंब  सीमाशुल्क मंजुरीमध्ये आणि पुरवठा साखळीत अडथळा ठरू शकतो. निर्यातकांनी, परदेशी ग्राहकांशी असलेले करार ज्यामध्ये चलन जारी करण्याची आवश्यकता असू शकते ते विचारात घेतले पाहिजेत.

निष्कर्ष

कर चलने नियोजनबद्ध पद्धतीने पाठवली जातात, त्यामुळे व्यक्ती आणि व्यासायिकांनी प्रमुख तारखा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. या तारखा विसरल्या तर आर्थिक आणि कायदेशीर परिणामांसारख्या समस्या होऊ शकतात. चलन केव्हा जारी करायचे, नोंदी कधीपर्यंत ठेवायच्या आणि वेळेवर अचूक अहवाल सादर करणे किती महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टी कर पालनासाठी गरजेचे आहे. 

सारांश पहायचे तर,

अद्ययावत आर्थिक व्यवस्थापनासाठी या महत्त्वाच्या तारखा आणि मुदती लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि सर्वसाधारण पालनापलीकडे जाते. व्यवहाराच्या पारदर्शक कार्यचालन, अचूक आर्थिक अहवाल आणि कर अधिकाऱ्यांच्या दृष्टीने विवेकी दृष्टीकोन या तारखा पाळल्याने सुनिश्चित होते. 

तुम्ही लघुआस्थापनेचे मालक, स्वतंत्र कंत्राटदार किंवा मोठ्या आस्थापनाचे कर्मचारी असलात तरीही या तारखांची असणारी जाणीव आणि त्या पूर्ण करण्यासाठीची तुमची निष्ठा यामुळे सुव्यवस्थित आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य आर्थिक व्यवहारात फायदा होईल. कायद्यामध्ये आणि GST कर चलन जारी करण्याच्या अंतिम मुदतीमध्ये होणाऱ्या कोणत्याही बदलांबाबत माहिती होण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे  किंवा योग्य कर अधिकाऱ्यांशी संवाद नेहमीच महत्त्वाचे ठरते आणि अधिक माहितीसाठी तुम्ही CaptainBiz पाहू शकता.

FAQs

  • करचलन केव्हा पाठवावे?

पुरवठ्याच्या वेळी सर्व नोंदणीकृत GST करदात्यांना करचलन जारी करण्याची गरज भासते. इनपुट टॅक्स क्रेडिट साठी दावा करताना, खरेदीदाराला घेतलेल्या कोणत्याही उत्पादने किंवा सेवांसाठी त्याला करचलन पुरवावे लागते. विविध आर्थिक अहवाल सादर करण्यासाठीदेखील करचलन गरजेचे असते.

  • GST चलन कधी पाठवावे?

कोणत्याही रकमेसाठी GST चलन पाठवणे ही चांगली कल्पना आहे, पण GST कायदे आणि त्याचे नियम यांच्यानुसार दोनशे रूपये कमी मूल्य असलेल्या वस्तू किंवा सेवा यांच्यासाठी करचलन जारी करण्याची गरज नाही. जर प्राप्तकर्त्याला चलनाची गरज नसते जर प्राप्तकर्त्यांनी विनंती केली तर चलन जारी करता येऊ शकते.

  • विक्रेता डेबिट नोट केव्हा काढतो?

खरेदीदाराकडून विक्रेत्याच्या देय रकमेत वाढ होते, तेव्हा जर करचलनातील करपात्र मूल्य हे आकारल्या जाणाऱ्या देय रकमेपेक्षा कमी असल्यास विक्रेता डेबिट नोट जारी करतो. करचलनावरील करमूल्य हे आकारल्या जाणाऱ्या मूल्यापेक्षा कमी असते

  • करचलनासाठी कोणत्या स्वरुपात आवश्यक आहे?

करचलन कोणत्याही स्वरूपात असू शकते. तरीही करचलनामध्ये काही महत्त्वाचे घटक असतात. GST च्या अधीन असणाऱ्या कंपनीने जारी करण्याच्या चलनांवर पुरवठादाराचा नाव, पत्ता आणि जीएसटीआय नंबर असे 16 घटक असणे आवश्यक आहेत

  • चलनाची तारीख देय तारखेपासून वेगळी कशी असते?

चलनाची तारीख म्हणजे ज्या दिवशी पावती पुस्तकामध्ये दिसणारी तारीख, देय तारीख म्हणजे चलनाशी निगडीत देयरक्कम मिळण्याची तारीख. GST चलन नियम (5) अंतर्गत चलन दाखल करण्याची तारीख अपवादात्मकरित्या  उत्पादने आणि सेवांनुसार बदलते. 

  • सातत्यपूर्ण सेवांच्या पुरवठ्यासाठी चलन केव्हा जारी करावे?

ही गोष्ट चलनाची प्रक्रिया तसेच दस्तऐवजांसाठीदेखील योग्य आहे, ते व्यावसायिक वाटले पाहिजे आणि त्यावर संस्थेचे बोधचिन्ह, संकेतस्थळाचा पत्ता आणि व्यावसायिक भाषेत असावे. प्रभावी चलन जारी कऱणे आणि देयरक्कमेच्या संकलनाद्वारे ग्राहकांचे वाढते समाधान प्राप्त होऊ शकते. दुसरीकडे, चुकीच्या पद्धतीने चालवलेल्या व्यवस्थेमुळे व्यवसायाच्या प्रतिष्ठेला त्वरीत हानी पोहोचवली जाऊ शकते. 

  • चलने केव्हा जारी करावीत?

उद्योग जगतात, उत्पादने वितरीत होताच त्यासाठी चलन जारी करण्याची तरतूद आहे आणि चलनाची तारखेनंतर तीस दिवसांपर्यंत पत अटी वाढवली जाते.  प्रत्येक महिन्याच्या शेवटी सेवांच्या तरतुदींशी निगडीत चलने काढावी लागतात. पुन्हा एकदा चलनाच्या तारखेपासून ३० दिवसांचा क्रेडिट कालावधी लागू होतो. 

  • महिन्याप्रमाणे प्राप्तिकर दिनदर्शिकेची तुम्हाला का गरज आहे?

तुम्ही वेळेवर करभरणा हा केवळ तुमचे खूप पैसे वाचवत नाही तर तुम्हाला अनेक समस्या जसे भुर्दंड आणि इतर गोष्टींचे पालन न केल्यामुळे पत खराब होणे यापासून वाचवते. 

  • चलन ओळख क्रमांक म्हणजे काय?

आस्थापना जारी तयार करत असलेल्या प्रत्येक चलनाला एक विशिष्ट ओळख देणारा क्रमांक जो चलन ओळख क्रमांक किंवा चलन क्रमांक म्हणून ओळखला जातो. आस्थापनेला विशिष्ट ग्राहकाचा व्यवहार लक्षात घेणे आणि संदर्भ घेणे सुलभ होण्यासाठी चलन क्रमांक आवश्यक असतो. चलनाचा विशिष्ट क्रमांकात अक्षरे आणि आकडे असू शकतात.

  • निर्यात चलना बरोबर कोणते दस्तावेज असले पाहिजेत?

निर्यात चलनांबरोबर शिपिंग देयक हे अतिरिक्त महत्त्वाचा दस्ताऐवज पाठवावा लागतो. GST कायद्याच्या नियमांनुसार कर कालावधीसाठी निर्यातकांना त्यांच्या जमा झालेल्या इनपुट टॅक्स क्रेडिट परतावा मिळवण्याचा अधिकार आहे. परतावा दाव्याची प्रक्रिया GST प्राधिकरणांद्वारे शिपिंग खर्चाला प्रथम प्राधान्य दिले जाते.

author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply