नियत वेळेत कर चलन (इनव्हॉईस) जारी करण्याची खात्री कशी करावी?

Home » Blogs » नियत वेळेत कर चलन (इनव्हॉईस) जारी करण्याची खात्री कशी करावी?

Table of Contents

ओळख

करचलन नियत वेळेत जारी करण्यावर कर कायद्याचे पालन आणि सुरळीत आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. त्यात झालेल्या विलंबामुळे लेखापालनातील अनियमितता, देयकांना उशीर आणि अगदी कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागते. हे सर्व त्रास/समस्या टाळण्यासाठी सामान्य लोक आणि आस्थापना/कंपन्यांकडे कर चलने वेळेत पाठवण्याची हमी देणारी अत्यंत कार्यक्षम पद्धती असणे आवश्यक आहे. या लेखामध्ये, आपण नियत वेळेतकरचलन पाठवण्याची खात्री देणारी आणि त्यातून व्यवसायांना आर्थिक व्यवहार प्रामाणिक आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी उपयोगी पडतील अशी व्यवहार्य धोरणे आणि उपाय जाणून घेणार आहोत. 

नियत वेळेत कर चलन पाठवले जाण्याची खात्री कशी करावी?

करचलन नियत वेळेत पाठवण्याची खात्री करताना कायदेशीर मान्यता आणि आर्थिक नियंत्रण राखणे महत्त्वाचे आहे. करचलन तयार करणे त्याच्या वितरणाची अचूक आणि सामाईक अंतर्गत प्रक्रिया स्थापित करणे ही महत्त्वाची बाब आहे. त्यातून देयक प्रक्रियेत/बिलाच्या प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या गटातल्या प्रत्येक सदस्याला त्याची कामे स्पष्ट समजली पाहिजेत. तसेच चलनाचे स्वरूप आणि काढण्याची वेळ याचे निकष ठरवून द्यायला हवे. त्यामुळे व्यवसायातले गैरसमज टाळले जातील. चुका कमी होती आणि चलन नियत वेळेत पाठवण्यासाठी योग्य प्रक्रिया पद्धती विकसित करून त्याची हमी देता येईल.

योग्य प्रक्रिया पद्धतीच्या दृष्टीकोनाचा सर्वात मोठा फायदा असा की चलन काढण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जाऊ शकतो. लेखापालन/अकाउंट आणि चलनासाठी असलेली विशेष सॉफ्टवेअर्स खरेदी केल्यास संपूर्ण चलनाची प्रक्रिया सुलभ होते. यामध्ये सॉफ्टवेअर्समध्ये स्वयंचलित आकडेमोड, चलनाची टेम्पलेटस् आणि देय रकमेच्या प्राप्तीसाठी पाठपुरावा कऱणे यासारख्या वैशिष्ट्यांमुळे आस्थापनांना  देयके तयार करणे आणि वितरीत करणे याचा वेग वाढवता येतो. या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये, ग्राहकांना काही दिवस आधी किंवा देय तारखेला देयरक्कम चुकती करण्याची आठवण करणे आणि सूचना स्वयंचलितपणे पाठवण्याची तरतूद करता येऊ शकते. त्यामुळे देयकाचा वेळेवर भरणा करणे तसेच मागील बाकी राहाण्याच्या घटना कमी होण्यास मदत होईल.

पुढची गरज आहे ती म्हणजे एक प्रमाणित चलन नमुना म्हणजे टेम्पलेट विकसित करण्याची. या टेम्पलेट/नमुन्यामध्ये सर्व आवश्यक माहिती, जसे फर्म चे नाव आणि संपर्क तपशील, विशिष्ट चलन क्रमांक, उत्पादने किंवा पुरवल्या जाणाऱ्या सेवा यांचे तपशीलवार वर्णन, वस्तूच्या प्रमाणाची यादी आणि प्रत्येकाची किंमत आणि एकूण रक्कम त्यात असली पाहिजे. पूर्वनिर्धारित नमुन्यामुळे चलन तयार करण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ झाल्यामुळे महत्त्वाची माहिती विसरणे/ गहाळ होण्याची शक्यता कमी होते.

करचलन जारी करण्यातला उशीर कसा टाळावा?

captainbiz करचलन जारी करण्यातला उशीर कसा टाळावा

स्रोत

GST कर चलन जारी करण्यासाठी असलेल्या वेळमर्यादेचे पालन करताना, करचलन पाठवण्यात होणारा उशीर कसा टाळता येईल ते पाहूया.

करचलन/देयके जारी करण्याची अंतर्गत प्रक्रिया निर्मिती-

करदेयके तयार करणे आणि ती वितरीत करणे यासाठी अचूक, प्रमाणित प्रक्रिया निर्माण करा आणि नोंदणीकृत करा. हे काम करणाऱ्या गटातल्या प्रत्येकाला या व्यवस्थेची माहिती असेल आणि तो त्याचे पालन करत असेल याची खात्री करा. गैरसमज आणि चुका कमी करण्यासाठी प्रत्येकाची भूमिका आणि कर्तव्य स्पष्टपणे सांगा.

 सॉफ्टवेअरचा वापर करा

लेखापालन आणि चलन तयार करण्यासाठीचे विशिष्ट सॉफ्टवेअर खरेदी करा. या उपायांमध्ये स्वयंचलित आकडेमोड, चलनाचे नमुने आणि स्मरण करून देणे याचा अंतर्भाव असल्याने देयक प्रक्रिया सुलभ होते. अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरमुळे, विलंब होणे कमी होते आणि  चलन तयार करण्याची प्रक्रिया सुविहित होते.  

चलनाचे समान मसुदे तयार करणे

सर्व माहिती अंतर्भूत असणारे एकसमान चलनाचे नमुने तयार करा. त्यात तुमच्या कंपनी, कंपनीचा विशेष असा चलन क्रमांक, उत्पादन किंवा सेवा यांचे तपशीलवार वर्णन/माहिती, प्रमाण, किंम आणि एकूण देय रक्कम असली पाहिजे. या नमुन्याचा वापर केल्यास उत्पादन प्रक्रिया वेग पकडते आणि चुका होण्याची शक्यता कमी होते.

देयकांसाठी कालमर्यादा

चलन तयार करणे आणि वितरण करणे यासाठी एक निश्चित कालमर्यादा ठरवा. नियमित वेळापत्रक- दैनंदिन, साप्ताहिक, द्विसाप्ताहिक किंवा मासिक असले तर ते तुमच्या आस्थापना आणि ग्राहकांना देयरक्कम चुकती करण्याचे नियोजन करण्यास उपयुक्त ठरते आणि त्यासाठीचा विलंबही कमी करते.  

पुनरावर्ती देयके जारी करणे

नियमित आवर्ती व्यवहारांसाठी स्वयंचलित चलननिर्मितीसाठी चलनाचे सॉफ्टवेअर तयार करून घ्या. त्यामुळे वेळापत्रकानुसार देयके पाठवण्यात अपयश किंवा दिरंगाईची शक्यता कमी होते.

पूर्वसूचना आणि स्मरणसंदेश पाठवणे

ग्राहकांना देय तारखेच्या किंवा त्या आधी काही दिवस आधी स्वयंचलित सूचना आणि आठवण करून देण्यासाठी चलन सॉफ्टवेअरच्या वैशिष्ट्यांचा वापर करा. त्यामुळे देयरक्कम लवकर जमा होण्यास आणि विलंब होण्याची शक्यता कमी होण्यास प्रोत्साहन मिळू शकते.

सॉफ्टवेअर प्रक्रियेचे मूल्यमापन

चलन पद्धतीचे नियमित पुनरावलोकन आणि मूल्यांकन करावे जेणेकरून ती अधिक चांगली आणि कार्यक्षम होण्यासाठीच्या बाजू लक्षात येतील. या देयक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तुमच्या गटाकडून येणाऱ्या शिफारशी आणि टीका स्वीकारा.

कर कायद्यांविषयी अद्ययावत रहा

कंपनी कार्यक्षेत्रातल्या कायद्यांविषयी अद्ययावत माहिती करून घ्या. कर नियमातील अलीकडील सुधारणा आणि तपशील यांचे पालन करणारे चलन जारी होते आहे याची खात्री केल्यास दंड टाळणे किंवा कायदेशीर समस्या टाळणे शक्य होईल. गरज असल्यास, नियमपालनाच्या हमी साठी कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा. 

या सर्व गोष्टींची अंमलबजावणी आणि वेळेवर चलन भरणा करून तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक उलाढालीत सुधारणा करू शकता, ग्राहकांच्या आत्मविश्वासात वृद्धी करू शकता आणि कायदेशीर आणि कर पालनातील गरजा देखील पूर्ण करू शकता.

Also Read: How Can I Ensure That I Issue Tax Invoices On Time?

करचलन जारी करण्यातील दिरंगाईचे परिणाम

करपात्र वस्तू पुरवणाऱ्या नोंदणीकृत पुरवठादाराला (अ)पुरवठ्या पुर्वी किंवा पुरवठ्यासाठी  वस्तू काढतेवेळी मालाचे दळणवळण करावे लागते किंवा (ब) सीजीएसटी कायदा 2017 (कर चलन) च्या कलम 31 (1) नुसार इतर कोणत्याही बाबतीत प्राप्तकर्त्याला वस्तूचे वितरण करणे किंवा उपलब्ध करुन द्यावी लागते तेव्हा कर चलन जारी करणे गरजेचे असते. यात विलंब झाल्यास व्यवसायांचा करअधिकारी आणि ग्राहक यांच्याशी असलेल्या परस्परसंवादावर परिणाम होऊ शकतो. कर चलनातील विलंबाचे काही मुख्य परिणाम खालील प्रमाणे दिसून येतात:

  • कायदे पालनातील अडचणीः अनेक कर कायदे आणि नियमांमध्ये कर चलन निर्धारित वेळेत पाठवणे अनिवार्य आहे. कर चलनातील विलंब हा नियमांचे उल्लंघन असल्याने ज्याचे दंड, शिक्षा किंवा कायदेशीर परिणाम होऊ शकतात.
  • रोखीच्या उपलब्धतेची आव्हानेः रोख खेळता पैसा राखण्यासाठी वेळेवर चलन जारी करणे आवश्यक आहे. विलंबामुळे रोख पैशात व्यत्यय आणू शकतो. त्यामुळे आस्थापनेला पुरवठादार, कर्मचारी यांना पैसे देणे आणि त्यांच्या स्वतःची आर्थिक कर्तव्य पार पाडणे अधिक कठीण होते.
  • महसूलात होणारी घट: बऱ्याचदा महसूलाला मान्यता मिळण्यासाठी चलन जारी करणे ही लेखापालन आणि आर्थिक अहवालातली पूर्वनिर्धारीत बाब असते. आस्थापनेचे आर्थिक विवरण आणि महसूल मान्यतेवर चलनातील विलंबाचा विपरीत परिणाम होऊ शकतो ज्याचा कंपनीचे मूल्य आणि आर्थिक स्थिरता यांच्यावर परिणाम होऊ शकतो.
  • ग्राहकांशी वाद: चलनातील विलंबामुळे ग्राहकांसमवेत गैरसमज आणि वाद उद्भवू शकतात. दरांच्या अचूकतेविषयी ग्राहक तुलना करू शकतात, सुधारणेची मागणी करू शकतात किंवा आवश्यक माहिती मिळेपर्यंत भरणा करण्यास नकार देऊ शकतात
  • ग्राहकसंबंधांमध्ये तणाव: चलनातील सातत्याने होणार विलंब हा ग्राहक संबंधांमध्ये तणावाचे कारण ठरल्याने विश्वास कमी होतो. देयक प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळू न शकणाऱ्या कंपनीवरचा ग्राहकांचा विश्वास कमी होतो.
  • सवलतीमध्ये तोटा:  लवकर देय रक्कम चुकती केल्यास काही ग्राहक किंवा पुरवठादार सवलती देऊ शकतात. जर चलनाला विलंब झाल्यास कंपनी या मूल्य-बचतीच्या शक्यता गमावू शकते.
  • कराराचे परिणाम: चलनाच्या मुद्याशी संबंधित कलमांचा काही सहमती आणि करारात समावेश असतो. त्या आवश्यक कलमांचे पालन करण्यात अपय़श आल्यास करारात मतभेद किंवा कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.
  • विलंबामुळे लेखापरीक्षण आणि कर छाननीः  सातत्याने चलन पाठवण्यात विलंब करणाऱ्या कंपन्यांवर लेखापरीक्षक आणि कर अधिकारी यांच्याकडून फेरतपासणीची कारवाई होऊ शकते. यात असमानता आढळल्यास अतिरिक्त खर्च करावा लागून कदाचित दंड आकारणी होऊ शकते.

नोंदणीकृत करदात्याने कमतरता असलेले चलन अधिसूचना जारी होण्यापुर्वी जमा केले तर वर उल्लेखिलेली विशिष्ट दंडाची तरतूद कदाचित लागू होणार नाही. त्याऐवजी कलम 125 अंतर्गत सर्वसामान्य दंड लागू होऊ शकतो. 

कर चलनातील विलंबामुळे कंपन्यांना गंभीर कार्यचालन, आर्थिक आणि कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.  चलनाची प्रभावी प्रक्रिया उभारणे, चलन जारी करण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर मध्ये गुंतवणूक करणे आणि प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कर कायदे आणि कराराच्या बंधनांकडे कठोर लक्ष देणे या सर्व गोष्टी अवघड आहे.  आस्थापनेची आर्थिक स्थिरता आणि आर्थिक पत चांगली राखण्यासाठी नियत वेळेत चलन जारी करणे आवश्यक आहे. ती केवळ योग्य व्यवसाय पद्धती नाही तर कायदेशीर गरजही आहे.

Also Read: What Are The Consequences Of Issuing A Tax Invoice Late?

करचलनासाठी सॉफ्टवेअर

टॅक्स इन्व्हॉईस इशुअन्स सॉफ्टवेअर च्या अनेक महत्त्वाच्या फायद्यांपैकी सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कर कायद्याच्या पालनाचा आधारस्तंभ म्हणून त्याकडे पाहिले जाऊ शकते. सध्याच्या व्यावसायिक पर्यावरणासाठी ते गरजेचे आहे. नियत वेळेत चलन जारी करणे, त्यात सर्व आवश्यक माहिती अंतर्भूत करण्याची हमी, भविष्यातल्या कायदेशीर समस्या, आर्थिक दंड यांना प्रतिबंध करणे हे त्याचे इतर फायदे आहेत. यातील सॉफ्टवेअर प्रोग्राम देयक प्रक्रिया स्वयंचलित करतात आणि मानवी चुकांची शक्यता लक्षणीयरित्या कमी करतात त्यामुळे प्रभावी कार्यचालनाचा ते गाभा ठरते.

याच्या अचूकतेमुळे आर्थिक नोंदी ठेवणे तसेच धोऱणात्मक नियोजन आणि निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळते. वसूल न झालेल्या चलनाचा मागोवा घेऊन आणि महसूल वाढीला चालना देत, रोखीच्या उपलब्धतेचे व्यवस्थापन करून त्वरीत आणि प्रभावी चलन जारी करते. त्याशिवाय जलद आणि व्यावसायिक देयकामुळे एक नियोजनबद्ध आणि ग्राहक केंद्री वृत्ती दर्शवते जी आत्मविश्वास आणि ग्राहक समाधानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. 

ही सॉफ्टवेअर्स संवेदनशील आर्थिक माहितीचे संरक्षण कऱण्यासाठी सुधारित माहिती संरक्षण आणि साठवणूक प्रक्रिया देखील पुरवतात ज्यामुळे आस्थापनांना त्यांच्या नोंदीच्या सचोटी आणि गोपनीयतेची हमी मिळते. ही सॉफ्टवेअर्स महत्त्वपूर्ण मौल्यवान आर्थिक माहिती तयार करतात जी भविष्यातील अंदाज, अंदाजपत्रक आणि सखोल विश्लेषण यासाठी वापरली जाऊ शकते. या सर्व गोष्टी आस्थापनेच्या शाश्वत विकासासाठी मदत करु शकतात.

Also Read: Choosing The Right GST Billing Software: A Comparative Review

निष्कर्षः

आर्थिक व्यवस्थापनामध्ये, ‘वेळ म्हणजे पैसा’ ही म्हण आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने खरी आहे आणि कर चलन जारी करण्याच्या बाबतीत ती विशेषत्वाने खरी आहे. चलनाला विलंब झाल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे रोख पैशांचा विलंबित पुरवठा आणि नियामक गैरशिस्त. या मार्गदर्शकामध्ये दिलेल्या धोरणांचा आणि शिफारशींचा वापर करन व्यवसाय आणि व्यक्ती कर चलन योग्य वेळी पाठवली जातील याची खात्री करण्यासाठी आवश्यक तो कठोर दृष्टीकोन विकसित करू शकतील. 

तुमच्या व्यवसायाच्या किंवा वैयक्तिक इतर कोणत्याही आर्थिक पैलूप्रमाणे कर चलन तत्परतेने आणि काळजीपूर्वक जारी करणे आवश्यक आहे. वेळेवर चलन जारी केल्याने केवळ सुरळीत आर्थिक व्यवहाराची सुविधा मिळते असे नाही तर ते जबाबदार आर्थिक व्यवस्थापन आणि कर कायद्याचे अनुपालनाविषयीची वचनबद्धता दर्शवते. कार्यक्षम चलन जारी करण्याची प्रक्रिया शिकून, स्मरणसंदेश लागू करून आणि उत्तम नोंदी ठेवण्याच्या पद्धती वापरून तुम्ही चलनाला विलंब होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी करू शकता. कॅप्टनबिझ कडून कर चलन जारी करण्याच्या सर्वोत्तम पद्धती जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • कर चलन कोणी पाठवावे?

करपात्र उत्पादने, सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा करणारे आणि ग्राहकांकडून GST गोळा करणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने कर चलन पुरवले पाहिजे.

  • कर चलन पाठवण्यासाठी किती कालावधी लागतो?

नियम 47  नुसार सेवा पुरवठ्याच्या तारखेपासून तीस दिवसांनी कर चलन वितरीत करणे आवश्यक आहे. ती त्याची अंतिम मुदत आहे.

  • कर चलन म्हणजे काय ?

करपात्र उत्पादने किंवा सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा करणारी आणि ग्राहकाकडून GST आकारणाऱ्या प्रत्येक  नोंदणीकृत व्यक्तीने कर चलन पुरवले पाहिजे. त्याशिवाय, विक्रेत्याला आपल्या ग्राहकांकडून GST आकारणी करणे आणि त्याच्या पुरवठादारांना भरलेल्या GST वर इनपुट टॅक्स क्रेडिट चा दावा करण्यास सक्षम करण्याव्यतिरिक्त, कर चलन पुरवलेल्या उत्पादन आणि सेवांवर आकारलेला GST दर देखील दर्शवतो.

  • कर चलनाऐवजी देयक पाठवणे योग्य आहे का?

पुरवठ्याचे देयकः जर नोंदणीकृत व्यक्ती कंपोझिशन सिस्टिम अंतर्गत कर भरत असेल किंवा सूट असलेल्या वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही पुरवत असेल तर कर चलनाऐवजी पुरवठ्याचे देयक द्यावे. जर पुरवठादाराला ग्राहकाकडून GST आकारण्याची परवानगी नसेल तर पुरवठा देयकामध्ये कर रक्कम समाविष्ट नसते.

  • नोंदणीकृत व्यक्तीने कर चलन कधी जारी करावे?

नोंदणीकृत व्यक्ती करपात्र उत्पादनांचा पुरवठा करत असेल तेव्हा तिने कर चलन पुरवले पाहिजे. प्राप्तकर्त्याला पुरवण्यासाठी जेव्हा माल काढला जातो तेव्हा चलन आधी किंवा त्याच वेळी पाठवणे आवश्यक आहे. पुरवठ्यासाठी ज्या ठिकाणी माल वाहातुकीची गरज नसते आणि माल लगेच प्राप्तकर्त्याला वापरण्यायोग्य होतात अशा प्रकरणात ताबडतोब चलन पाठवणे आवश्यक असते. 

  • वस्तूंचा सातत्यपूर्ण पुरवठा केला जात असेल तर कर चलन कसे जारी करावे?

सतत मालाचा पुरवठा होत असेल तेव्हा कर चलना जारी करणे हे कलम 31 (4) द्वारे नियंत्रित होते. ज्यामध्ये, सातत्यपूर्ण देयरक्कम किंवा खात्यांचे विवरण समाविष्ट आहे, तेव्हा परिस्थितीनुरूप माल देण्यापुर्वी किंवा देताना चलन जारी करणे आवस्यक आहे. 

  • ई-इन्व्हॉईसिंग सॉफ्टवेअर GST कायद्याचे पालन करण्यासाठी लहान व्यवसायांना कसे मदत करते?

GST कायद्यानुसार, करपात्र वस्तूंचा पुरवठा करणाऱ्यांनी, पुरवठ्याच्या वेळी कर चलन, ज्यात उत्पादनाचे वर्णन, प्रमाण आणि मूल्य यांचा समावेश असलेले तसे कराची विशिष्ट शुल्क यांचा समावेश असलेले करचलन जारी करावे. यामुळे सरकारने लहान उद्योगांना GST कायद्याचे पालन करण्यास मदत करण्यासाठी विनामूल्य इलेक्ट्रॉनिक इनव्हॉयसिंग सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले आहे. 

  • इनव्हॉइसिंग सॉफ्टवेअर लहान व्यवसायाला जीएसटीचे पालन करण्यासाठी कशी मदत करते?

GST कायद्यानुसार, करपात्र वस्तूंचा पुरवठा करणार्‍या नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने पुरवठ्याच्या वेळी कर चलन जारी करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये उत्पादनांचे वर्णन, प्रमाण आणि मूल्य तसेच विशिष्ट कर शुल्क समाविष्ट आहे. लहान कंपन्या GST कायद्याचेपालन करण्यासाठी स्वतःला मदत करू शकतील, सरकारने विनामूल्य ई-इनव्हॉइसिंग सॉफ्टवेअर देखील उपलब्ध केले आहे. 

  • एक्सप्रेस चलन म्हणजे काय?

विनामूल्य इन्व्हॉइसिंग सॉफ्टवेअर मुळे चलन जारी करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. तुम्ही त्यामध्ये खर्च समाविष्ट करू शकता, देय पद्धती जोडू शकता, ग्राहक माहिती भरू शकता आणि अगदी थोडी बटणे दाबून तुमचे बोधचिन्ह/ लोगो अपलोड करू शकता. आणखी काही बटणे दाबल्यास थेट तुमच्या क्लायंटच्या मेलबॉक्समध्ये चलन पाठवले जाईल. 

  • करदात्यांना ई-इनव्हॉइसिंग तरतुदींच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागेल?

नवी ई-इनव्हॉइसिंग प्रक्रिया अंमलात आणताना करदात्यांना पुढील काही समस्या भेडसावतील त्याची चर्चा पुढे केली आहे: ज्या कंपन्यांना आयआरपी मध्ये चलन माहितीचा प्रवाह सुलभ करायचा आहे आणि ईआरपी प्रणालीमध्ये परत ई-इनव्हॉइस आणायचे आहे त्यांना इंटरफेसमध्ये आयआरपी/जीएसपी/एएसपी सह ईआरपी सिस्टीम आणावी लागेल. याच कारणामुळे, जीएसटीएन ने एपीआयज् उपलब्ध करून दिले आहेत.

author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply