कर चलन नियमित वेळेत जारी करण्याचे महत्त्व

Home » Blogs » कर चलन नियमित वेळेत जारी करण्याचे महत्त्व

Table of Contents

परिचय

दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने जगभरातल्या सर्व कंपन्यांसाठी, नियमित कर देयके जारी करणे हा महत्त्वाचा घटक आहे. देवाणघेवाणीच्या नोंदीपेक्षाही, चलन हे कंपनीच्या एकूण परिणामकारक कामकाज, कायदा पालन आणि आर्थिक स्थिरता यांच्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे साधन आहे. आस्थापना वेळेत पैसे फेडते, ग्राहकांचा विश्वास राखणे, कर निकषांचे पालन करणे आणि उत्तम प्रतिष्ठा निर्माण करणे हे सुनिश्चित करण्यासाठी कर कायद्यानुसार त्वरीत देयके तयार करणे वारंवार गरजेचे असते. नोंदणीकृत करपात्र वस्तू पुरवठादार व्यक्तीने, सीजीएसटी कलम 2017 (कर चलन) च्या सेक्शन 31 (1) नुसार प्राप्तकर्त्याला वस्तूंचा पुरवठा करण्यापुर्वी किंवा करताना किंवा (अ) जिथे पुरवठ्यामध्ये मालाचे दळणवळण अंतर्भूत असते असा पुरवठा करण्यासाठी वस्तू काढतेवेळी किंवा (ब) प्राप्तकर्त्याला वस्तूंचा पुरवठा केल्यावर किंवा वस्तू उपलब्ध केल्यावर, कोणत्याही प्रकरणात करचलन जारी करणे आवश्यक आहे. 

ठराविक वेळेत कर चलन जारी करण्याच्या विविधांगी पैलूंचे महत्त्व या निबंधातून चर्चिले आहे. तसेच वेळेवर करचलन जारी करण्याचे फायदे आणि या महत्त्वाच्या प्रक्रियेतील विलंबामुळे होणारे तोटे यांचाही अभ्यास यात केला आहे. 

ठराविक वेळी करचलन जारी करण्याचे महत्त्व

नियत किंवा ठराविक वेळेत करचलन जारी करण्याच्या महत्त्वाविषयी अतिशयोक्ती करणे शक्य नाही कारण व्यावसायिक कामकाज आणि आर्थिक व्यवस्थापनासाठी ते फार महत्त्वाचे आहे. ठराविक वेळेत करदेयके जारी करणे का आवश्यक आहे याविषयीची मुख्य स्पष्टीकरणे खालील प्रमाणे:

  • कायदा पालन: व्यवसायांनी विविध न्यायक्षेत्राच्या कर कायद्यानुसार ठराविक वेळी करचलन पाठवणे आवश्यक आहे. या नियमांचा भंग केल्यास शुल्क, दंड आणि कायदेशीर परिणाम होऊ शकतात. व्यवसायांसाठी नियत वेळेत चलन जारी केल्याने कर अधिकाऱ्यांसमवेत चांगले संबंध प्रस्थापित करते.
  • रोख पैशाचे व्यवस्थापन: रोख पैशांच्या उपलब्धतेचे व्यवस्थापन करण्यासाठी, तत्परतेने चलन जारी करणे गरजेचे असते. त्यामुळे आस्थापनेला वेळेत देयरक्कमची फेड केली जाते आणि रोख पैशाच्या उपलब्धतेची समस्या टाळता येते. कर्जाची परतफेड वेळेत करण्याची हमी देता येते.
  • महसूल उपलब्धता: चलनाचा प्रश्न हा बहुतांशी खात्यातील महसूल उपलब्धता कशी आहे त्याच्याशी निगडीत असतो. उत्पन्न प्राप्त होताच उत्पन्नाची नोंद केली जाते, याची हमी नियत वेळेत जारी केलेले चलन देते तसेच आस्थापनाचे आर्थिक विवरण आर्थिक आरोग्याचे अचूक प्रतिनिधित्व करते.
  • ग्राहकांचा विश्वास: ठराविक वेळेत, अचूक चलन जारी केल्याने ग्राहकांप्रती विश्वास वृद्धींगत करण्यास मदत होते. त्यामुळे विश्वासार्हता आणि व्यावसायिकता प्रदान केली जाते, जी व्यवसायवृद्धी, निष्ठावान ग्राहक आणि अनुकूल शिफारस करण्यास प्रोत्साहन देते.
  • मतभेदांचे निराकरण: ठरलेल्या वेळेत चलन जारी केल्यास ग्राहकांसमवेत वाद होण्याची शक्यता कमी होते. जेव्हा चलन ठराविक वेळेत आणि योग्य पद्धतीने जारी केले जाते तेव्हा शुल्क आणि देयकाच्या अटींविषयी गैरसमजूत किंवा विवाद होण्याचे प्रसंग कमी येऊ शकतात.
  • व्यावसायिक प्रतिष्ठा: देयके वेळत पाठवणाऱ्या आस्थापनांची अंतर्गत संरचना बहुतेकदा चांगली असते आणि त्या ग्राहक केंद्री असल्याचे पहायला मिळते. परिणामी ग्राहक आणि भागीदार व्यावसायिक प्रतिष्ठा आणि ब्रँड प्रतिमा याकडे अधिक अनुकुल दृष्टीने पाहातात.
  • देयरकमेच्या अटींचे पालनः ठराविक वेळेत तत्परतेने जारी केलेल्या चलनामुळे, देयरक्कम चुकती करण्याच्या मान्य अटींचे पालन ग्राहकांकडून केले जाते. देयरक्कम देण्याच्या वेळमर्यादेचा आठवण करून दिल्यास दिरंगाईची शक्यता कमी होते.

सुलभ प्रशासकीय प्रक्रियेच्या पलीकडे ठराविक वेळेत करचलन जारी करण्याचे महत्त्व आहे, कंपनी कायद्याचे पालन करणे, आर्थिक स्थिरता कायम ठेवणे, उत्तम ग्राहक संबंध प्रस्थापित करणे आणि व्यवसायाच्या संपूर्ण यशासाठी हे आवश्यक आहे. सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आणि स्वयंचलित चलन व्यवस्थेवर अधिकाधिक अवलंबून असणाऱ्या कंपन्यांसाठी ठराविक वेळी करचलन भरण्याचे भरपूर फायदे होताना दिसतात. गळेकापू स्पर्धेच्या वातावरणात व्यवसायांना त्यामुळे भरभराटीची संधी मिळू शकते.

अधिक वाचा: नियत वेळेत कर चलन (इनव्हॉईस) जारी करण्याची खात्री कशी करावी?

समस्या जाणून घेणे आणि सोडवणे 

समस्या जाणून घेत त्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे. विशेषतः देयकांशी निगडीत समस्या असतील तर त्याला आस्थापनेने प्राधान्य द्यायला हवे. या सक्रीय दृष्टीकोनामुळे, समस्या जाणून घेत त्यावर योग्य ती कारवाई करणे, ती अधिक गुंतागुंतीची होण्यापासून रोखणे किती जटील आहे आणि त्यामुळे आस्थापनेची आर्थिकता आणि प्रतिमा धोक्यात येऊ शकते हे अधोरेखित होते. 

देयकांशी निगडीत समस्या असेल तर समस्या लवकर ओळखणे आणि वेळीच त्यावर उपाय शोधण्याचे अनेक फायदे आहेत. प्रामुख्याने ग्राहकांशी सुसंवाद राखण्यासाठी त्याचा फायदा होतो. देयकांशी निगडीत समस्या जसे अयोग्य देवघेव व्यवहार किंवा देयके यांच्यावर त्वरीत कृती करणे, हे ग्राहकांच्या समाधानाची किंमत व्यवसायाला आहे हे दर्शवते. परिणामी, ग्राहकांची वाढती निष्ठा, व्यवसायाची पुनरावृत्ती आणि इतरांना केलेल्या अनुकुल शिफारशी हे फायदे होतात. 

त्याहीपुढे जाऊन समस्या वेळीच ओळखणे आणि प्रतिसाद देणे यामुळे उत्पन्नात घट टाळता येऊ शकते. देयक न भरण्याच्या समस्यांमुळे आस्थापनेच्या महसूलात तोटा होऊ शकतो. या समस्या चटकन् ओळखून आणि त्यावर उपाय करून संस्था, त्यांच्या आर्थिक स्थिरतेला संरक्षित करू शकते आणि सर्व वैध देयरकमा मिळण्याची हमी देऊ शकते. 

समस्या लवकर सोडवल्यास कामकाजाचा खर्चही कमी होऊ शकतात. समस्या सोडवण्यासाठी जास्त वेळ घेणाऱ्या गटांना, जास्त गुंतागुंतीच्या आणि मोठ्या प्रमाणावरच्या समस्या सोडवण्यासाठी जास्त वेळ आणि स्रोतांचा वापर करावा लागू शकतो. त्याचा परिणाम प्रशासकीय खर्च वाढण्यात होऊ शकतो. देयक निगडीत समस्या लवकर सोडवल्याने व्यवसाय आपले स्रोत अधिक कुशलेतेने वापरू शकतात आणि कदाचित अधिक यशस्वी देखील होऊ शकतात. 

त्याशिवाय, समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाय काढणे यामुळे माहितीच्या अचूकतेमध्येही सुधारणा करू शकतात. देयकांच्या समस्यां लवकर ओळखल्यामुळे माहितीतल्या चुका आणि अनियमितता सुधारता येतात, निर्णयक्षमता सुधारता येते आणि परिणामी आर्थिक अहवाल अधिक विश्वासार्ह होऊ शकतो. 

शेवटी, या सर्वांतून व्यवसायाची योग्यता सुधारते. देयकाशी निगडीत अडचणी चटकन् सोडवणे हे अवलंबित्व आणि व्यावसायिकता दर्शवणारे आहे. जे व्यवसाय समस्या चटकन् आणि परिणामकारकरित्या निराकरण करण्यास वचनबद्ध असतात ते त्यांच्या ग्राहक व भागीदारांचा आत्मविश्वास आणि कटिबद्धता मिळवण्याची अधिक शक्यता असते.

सारांश बघायचा तर देयक निगडीत समस्या लवकर शोधणे आणि सोडवणे या सक्रीय दृष्टीकोनाचे विविध फायदे आहेत, जसे ग्राहकांसमवेतचा बंध मजबूत होतो, सुरक्षित महसूल, खर्चामध्ये कपात, अचूक माहिती आणि वाढलेली प्रतिष्ठा. आर्थिक देवाणघेवाणीचे गुंतागुंतीचे जग व्यवसाय उत्तमरित्या व्यवस्थापित करू शकतात आणि या धोऱणाला प्राधान्य दिल्याने दीर्घकालीन यशाची खात्री देखील देऊ शकतात. 

करचलन जारी करण्यातल्या विलंबाचा दंड टाळता येईल का?

captainbiz करचलन जारी करण्यातल्या विलंबाचा दंड टाळता येईल का

समस्या सोडवण्यातील विलंबाची परिणती कामकाजाच्या खर्चवाढीत होऊ शकते. मॅककिन्से अँड कंपनीने दिलेल्या अहवालानुसार, ज्या आस्थापना समस्या ओळखून सोडवण्याला प्राधान्य देतात त्यांच्या कामकाज खर्चामध्ये 25% कपात होऊ शकते. त्यामुळे संस्थांसाठी, करचलन जारी करण्यातील विलंबामुळे लागणार दंड टाळण्यासाठी कर नियामकाचे पालन आणि कार्यक्षम चलन प्रक्रिया राबवण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. दंड आणि कायदेशीर परिणाम टाळण्यासाठी ठराविक वेळेत चलन जारी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा दंड टाळण्यासाठी खालील आवश्यक कृती आहेत. 

  • सर्वात पहिलं आणि महत्त्वाचे म्हणजे, आस्थापनांना त्यांच्या क्षेत्राला लागू असलेल्या कर कायद्यांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आवश्यक माहिती आणि तारखा समाविष्ट असलेले करचलन जारी करण्यासाठी विशेष पूर्वअट जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • व्यवसायांकडे प्रभावी देयक प्रक्रिया असाव्यात. यासाठी तुम्ही स्वयंचलित साधने आणि योग्य आणि वेळेवर देयके तयार करण्यासाठी चलन जारी करणारे सॉफ्टवेअर वापरले पाहिजे. वेळेवर देयरक्कम मिळण्यासाठी या व्यवस्था स्मरणसंदेश देण्यास सक्षम असतात.
  • तिसरी गोष्ट म्हणजे सुनियोजित नोंदी ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्ही, जारी केलेल्या चलनांच्या नोंदी, जारी करण्याच्या तारखा आणि पुरवठा तारखा यांच्या नोंदी ठेवल्या असतील तर गरज भासल्यास कर अधिकाऱ्यांना त्या जुळवून दाखवणे सोपे जाते.
  • चौथे, चलन तयार करणे आणि वितरण करण्याची एक योग्य अंतर्गत पद्धती स्थापित केल्यास चलन जारी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान गटातल्या प्रत्येक सदस्याला त्याच्या विशिष्ट जबाबदारीची जाणीव असल्याची हमी मिळते. नियत वेळेत चलन पाठवण्याविषयी आपल्या कर्मचाऱ्यांना शिक्षित केल्यास पालन करण्यात भर पडेल.
  • पाचवे, आस्थापनांनी, चलन जारी करण्यात विलंब होण्याची शक्यता शोधून पडताळून पाहाण्यासाठी त्यांच्या चलन जारी करण्याच्या पद्धतींचे नियमित परीक्षण आणि ताळेबंद मांडला पाहिजे.
  • शेवटचे, व्यावसायिक सल्लागार किंवा कर व्यावसायिकांशी असलेला संपर्क संस्थेच्या उद्योग आणि त्या क्षेत्रातल्या विशेष कर कायद्यांचे पालन करण्याच्या दृष्टीने दिशादर्शक ठरू शकतात. ही कृती संस्थांना दंडाची जोखीम कमी करण्यास आणि तत्पर चलन जारी करण्यावर भर देऊन कर अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या आर्थिक व्यवहारांची प्रतिष्ठा चांगली राखण्यास मदत करतील.

Also Read: What Are The Consequences Of Issuing A Tax Invoice Late?

करचलन नियमित वेळेत जारी न करण्याचे परिणाम

करचलन ठराविक वेळेत भरण्यात अपयश आल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्याचे कंपनीच्या कामकाजावर आणि आर्थिक आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतात. पहिली गोष्ट म्हणजे वारंवार तत्पर चलन भरावे लागत असल्याने त्यात अपयश आल्याने कर कायदा मोडण्याची शक्यता आहे. या नियमित गरजांची पूर्तता न झाल्यास आस्थापनेला भुर्दंड, शिक्षा किंवा आर्थिक अडचणी आणि कायदेशीर समस्यांबरोबर कायदेशीर परिणाम भोगावे लागू शकतात. 

चलनातील विलंबामुळे कायदेशीर परिणामांच्या शक्यतेबरोबरच कंपनीच्या रोखीच्या उपलब्धतेवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वचनपूर्ती करणे, पुरवठादारांना परतफेड करणे, कामकाजाचा खर्च भागवणे अधिक आव्हानात्मक होते. संस्था फायदेशीर कामकाज आणि विकासाच्या संधींमध्ये गुंतवणूक करणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते. 

देयकांना होणारा विलंब देखील आर्थिक खात्यातल्या महसुलाच्या योग्य वसुलीवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे आस्थापनेचे आर्थिक चित्र बिघडू शकते. चुकीचे आर्थिक नियोजन आणि निर्णय हा देखील याचा परिणाम असू शकतो. 

चलनातील विलंबामुळे, ग्राहकांमधील समाधान आणि आत्मविश्वास कमी करून ग्राहक संबंध बिघडण्याची क्षमता असते. अशील/ग्राहक कंपनीच्या विश्वासार्हतेविषयी आणि व्यावसायिकतेविषयी शंका घेतात, त्यांचे संबंध तणावपूर्ण होऊ शकतात आणि भविष्यात त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो.

Also Read: Consequences Of Missing Elements On A Tax Invoice

निष्कर्ष

सारांश सांगायचा  कर देयक नियत वेळेत जारी कऱण्याचे महत्त्व यापेक्षा अधिक सांगता येणार नाही. व्यवसायाच्या भक्कम आर्थिक स्थितीचा पाया म्हणजे नियत वेळेत चलन जारी करणे, जे आस्थापनेच्या रोखी पैशाच्या उपलब्धतेची हमी देते, त्वरीत उत्पन्न देते आणि कर कायद्याचे पालन करते. त्याव्यतिरिक्त, विश्वासार्हता आणि व्यावसायिकता यांचा विस्तार करून ग्राहक सुसंवाद सुधारते, त्यामुळे ग्राहकाची निष्ठा आणि विश्वास वृद्धींगत होतो. त्याशिवाय, वेळेवर चलन जारी केल्याने मतभेद, कायदेशीर समस्या आणि आर्थिक दंड होण्याची शक्यता कमी होते. परिणामकारक कार्यचालनासाठी हे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे चुका कमी होतात आणि आर्थिक नोंदी ठेवणे सुलभ होते. अधिकाधिक कंपन्या, चलन जारी करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि स्वयंचलित व्यवस्थेवर अवलंबून असल्याने ठराविक वेळी चलनाचे फायदे मिळवण्याची योग्य वेळ आहे. 

‘वेळ म्हणजे पैसा’ अशा अर्थाची एक म्हण आहे, जी सध्याच्या जोडलेल्या, वेगवान व्यापारी जगतासाठी खरी आहे. चांगल्या आर्थिक व्यवस्थापनासाठी आणि आस्थापनेच्या दीर्घकालीन यशासाठी नियत वेळेत करचलन जारी करणे अजूनही आवश्यक आहे. नियत वेळेत करचलन जारी करण्याच्या सर्वोत्तम पद्धती जाणून कॅप्टनबिझ सह जाणून घ्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

  • करचलन कोणी जारी करावे?

करपात्र उत्पादने, सेवा किंवा दोन्हीचा पुरवठा करणारे आणि ग्राहकांकडून GST गोळा करणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने कर चलन पुरवले पाहिजे. पुरवलेल्या उत्पादन आणि सेवांवर आकारलेला GST दर देखील कर चलनात दर्शवला जातो.

  • तुम्हाला जीएसटी अंतर्गत करचलनाची गरज काय?

वस्तू, सेवा किंवा दोन्हींची तरतूद असल्याचा पुरावा म्हणून सेवा देण्याव्यतिरिक्त GST अंतर्गत करचलन जारी करणे हे प्राप्तकर्त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठीचे आवश्यक कागदपत्र आहे.

  • करचलनांच्या नोंदी जपून ठेवणे का महत्त्वाचे आहे?

सर्व जारी केलली करचलनांच्या नोंदी, चलन क्रमांक, जारी केलेली तारीख, ग्राहक माहिती आणि जीएसटीची एकूण रक्कम यासह ठेवल्या पाहिजेत. करचलनावर पुरवठादाराची किंवा जबाबदार व्यक्तीची स्वाक्षरी असणे महत्त्वाचे आहे. स्वाक्षरी असलेले चलन वैध धऱले जाते.

  • करचलनाची पावती महत्त्वाची का आहे?

उत्पादने किंवा सेवा पुरवठा केल्याचा पुरावा म्हणून करचलन जारी केले पाहिजे. पुरवठ्याच्या वेळी, नोंदणीकृत GST करदात्यांना करचलन सादर करावे लागते. इनपुट टॅक्स क्रेडीट साठी दावा करताना, खरेदीदाराने प्राप्त केलेले कोणतेही उत्पादन किंवा सेवा यांच्यासाठी करचलन सादर करावे लागते.

  • करचलन आणि व्यावसायिक चलन यांच्यातील फरक काय?

आंतरराष्ट्रीय वाणिज्य कार्यचालनामध्ये, आस्थापनेचे चलन हे वस्तू विक्री आणि त्याची मूल्य यांची नोंद म्हणून पाहिले जाते. ते विशेषतः कराशी संबंधित नाही. दुसरीकडे, कर चलन, हे ज्यामध्ये वस्तू किंवा सेवा यांची जेव्हा विक्री होते तेव्हा त्यावर लावलेल्या कराची रक्कम नोंदवते, ते कायदेशीररित्या लागू होणारा दस्ताऐवज असतो. 

  • ई-चलन काढण्यावर व्याप्तीचा कसा परिणाम होतो?

मागील वर्षांमध्ये तुम्ही जीएसटीआर-१ मध्ये दाखल केलेल्या अंदाजे एकूण चलनांच्या आधारावर, ई-चलन तयार करण्यासाठी व्यवस्था चलन अपलोड करण्याची क्षमता निर्धारित करते. परिणामी, वापरकर्ता किंवा चलनांचे प्रमाण खूप अधिक वाढल्यास आस्थापनांना ते अडचणीचे ठरू शकते. 

  • जर ई-चलन रद्द झाल्यास काय होऊ शकते?

ई-चलन रद्द झाल्यास पुन्हा आयआरएन (चलन संदर्भ क्रमांक) त्याच चलनावर तयार करता येत नाही. त्याशिवाय, त्रुटी दुरुस्त करण्यासाठी करदात्याला चलन क्रमांक अद्ययावत करावा लागतो, त्याच्या व्यवस्थेमध्ये नवीन चलन तयार करावे लागते आणि आयआरपीवर ई चलन तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागते. 

  • जर तुम्हाला करचलन मिळाले नाही तर काय होऊ शकते?

सीजीएसटी कायदा 2017 च्या 29 व्या कलमामध्ये सांगितल्यानुसार, वैध चलन किंवा क्यूआर कोड असणाऱ्या चलनाशिवाय वापरात असलेल्या वस्तू आणि/किंवा वाहने जप्त केली जाऊ शकतात. त्यातही, वेळेवर ई-वे चलन भरण्यात अपयशी ठरल्याने तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 16 नुसार आयटीसी चा दावा करण्यासाठी करचलन गरजेचे आहे. 

  • सीजीएसटी चलन म्हणजे काय?

सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 31 नुसार, प्रत्येक वस्तू आणि सेवा पुरवठ्यावेळी चलन किंवा पुरवठ्याचे देयक असले पाहिजे. वस्तुंशी निगडीत कर देयकः नोंदणीकृत व्यक्ती जेव्हा करपात्र उत्पादने पुरवते तेव्हा करचलन पुरवणे आवश्यक असते. प्राप्तकर्त्याला वस्तू वितरणासाठी बाहेर काढल्या जातात तेव्हा, एकतर पुरवठ्याआधी किंवा त्याचवेळी चलन दिले जाणे आवश्यक आहे. 

  • कर नियोजनासाठी लेखांकन महत्त्वाचे का आहे?

प्रभावी कर सज्जतेसाठी, उत्पन्न, खर्च, पावत्या आणि चलनांचा समावेश असलेल्या सर्व आर्थिक व्यवहारांची संपूर्ण नोंदी ठेवणे आवश्यक आहे. तुमचे कर कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी, कपातीसाठी अर्ज करण्यासाठी आणि कर नियमपालनासाठी त्याची मदत किंवा प्रोत्साहन मिळते.

author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply