वैध नसलेले कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करण्याचे महत्त्व

Home » Blogs » वैध नसलेले कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करण्याचे महत्त्व

Table of Contents

प्रस्तावना

पात्र असलेल्या व्यवसायिकांनी नोंदणी करणे आणि जीएसटी (GST) नोंदणी क्रमांक प्राप्त करणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही करपात्र वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करता, तेव्हा तुम्ही न विसरता (किंवा चूकता) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार केले पाहिजेत. तुम्ही एकाच व्यवसायाद्वारे करपात्र आणि करपात्र नसलेल्या दोन्ही वस्तूंचा पुरवठा करू शकतो. जीएसटी (GST) कायद्यांचे पालन करताना तुम्ही जीएसटी (GST) दरांसह अचूक जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे.

दंड आणि शिक्षा टाळण्यासाठी जीएसटी मान्यता (GST compliance) सुनिश्चित करणे आवश्यक आहे. जर तुम्ही बनावट बीजके (इनव्हॉइस) तयार केल्याचा अधिकार्‍यांना संशय असल्यास, त्यांना तुमच्या व्यवसायाचे आर्थिक व्यव्हार तपासणी (ऑडिट) करावी लागेल. त्याचा परिणाम अनावश्यक खर्च आणि व्यवसायात व्यत्यय निर्माण होईल. जर हा मुद्दा अधिक-मूल्याच्या कराशी संबंधित असेल, तर तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

या ब्लॉगमध्ये, जर तुम्ही अवैध बीजके (इनव्हॉइस) तयार केलेले असतील, तर आपण कर बीजके (टॅक्स इनव्हॉइसेस) रद्द करण्याचे महत्त्व जाणून घेऊ.

वैध असलेल्या कर बीजकाचे (टॅक्स इनव्हॉइसचे) महत्त्व

जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) हे एक असे अत्यावशक असे नोंदपत्रक आहे जे करपात्र वस्तू किंवा सेवांचा पुरवठा सिद्ध करते. बीजकामध्ये (इनव्हॉइसमध्ये) पुरवठा केलेल्या व्यवहाराचे सर्व तपशील असतील. प्रत्येक GST-नोंदणीकृत व्यवसायिकाने जेव्हा वस्तूंचा पुरवठा केला तेव्हा त्यांना जीएसटी (GST) कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. जीएसटीआयएन (GSTIN) हा व्यवसायकाच्या व्यवसायाचा नोंदणी क्रमांक आहे जो कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. इतर तपशील, जसे की जीएसटीचे विभाजन नमूद करणे हे देखील आवश्यक आहे.

जर तुमचा व्यवसाय ई-इनव्हॉइस तयार करण्याची अट पूर्ण करत असेल, तर सत्यापित आणि प्रमाणित ई-इनव्हॉइस एक वैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) आहे. ई-इनव्हॉइस ही इनव्हॉइसची (बीजकाची) सॉफ्ट कॉपी नाही. ई-इनव्हॉइस हे मूळ वैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) आहे. जर पुरवठ्यामध्ये मालाची वाहतूक होत असेल, तर ई-इनव्हॉइस ई-वे बिलाशी जोडले जाईल.

तुम्ही e-invoicing portal (इनव्हॉइस नोंदणी पोर्टल (IRP)) वापरणे आवश्यक आहे आणि कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. येथे सिस्टम ऑटोमॅटिकली ई-इनव्हॉइस तयार करेल. ई-इनव्हॉइसमधील तपशील जीएसटी फॉर्ममध्ये ऑटो-पॉप्युलेट या पद्धतीने (स्वयंचलितपणे) भरले जातील.

या संबंधित प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत, जसे की:

 • सर्व व्यवसाय पुरवठा नोंदपत्रके ही रिअल-टाइममध्ये कर-मान्यता स्वरूपात तयार करता येते
 • प्रत्यक्षरित्या प्रमाणीकरणाचा एकच स्त्रोत उपलब्ध असतो
 • व्यवसाय प्रक्रिया संपूर्णतः परिवर्तनशील बनते
 • ऑटो पॉप्युलेशनद्वारे कर बीजकात (टॅक्स इनव्हॉइसमध्ये) तपशीलांची त्रुटी कमी होते
 • जेव्हा आणि आवश्यक असेल तेव्हा ई-वे बिल तयार करता येते
 • जीएसटी (GST) फसवणूकी सारख्या कृती कमी होते
 • SME साठी बीजक (इनव्हॉइस) वित्तपुरवठा पर्यायामध्ये सुधारणा होते
 • पेमेंट सायकल वेगाने होते
 • प्रक्रिया खर्च कमी येतो
 • व्यवसाय वित्तपुरवठा पारदर्शकता सुधारित होते
 • व्यवसायातील कार्यक्षमता वाढते

Also Read: The Importance Of Issuing Tax Invoices In A Timely Manner

कर बीजकाची (टॅक्स इनव्हॉइसची) वैधता समजून घेणे

वार्षिक रु. 5 कोटींची उलाढाल असलेल्या अट पूर्ण न करणार्‍या व्यवसायांसाठी, ई-इनव्हॉइसिंग आवश्यक नाही. याशिवाय, आपण बीजक (इनव्हॉइस) स्वरूपाचे अनुसरण करून GST कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काही महिन्यांत सर्व जीएसटी-नोंदणीकृत व्यवसायांसाठी ई-इनव्हॉईसिंग अनिवार्य होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तरीसुद्धा, वैध कर बीजकासाठी (टॅक्स इनव्हॉइसाठी) आवश्यक असलेले तपशील जीएसटी- मान्यता (GST-compliant) कर बीजक आणि ई-इनव्हॉइससाठी समान आहेत. वैध कर बीजकामध्ये (टॅक्स इनव्हॉइसमध्ये) काही तपशील उपस्थित असणे आवश्यक अनिवार्य आहेत:

 • बीजक क्रमांक (इनव्हॉइस नंबर) आणि तारीख
 • ग्राहकाचे नाव
 • बिलिंग आणि पाठवण्याचा पत्ता
 • पुरवठादार आणि प्राप्तकर्त्याचा जीएसटीआयएन (GSTIN)
 • एचएसएन (HSN) कोड
 • करपात्र वस्तू किंवा सेवांचे मूल्य
 • सवलत (सूट)
 • जीएसटी (GST) दर, प्रकार आणि कराची रक्कम
 • पुरवठा केलेल्या वस्तू किंवा सेवांचे तपशील जसे की वर्णन, युनिट मूल्य आणि प्रमाण

वरील सर्व तपशिलांचा कर बीजकामध्ये (टॅक्स इनव्हॉइसमध्ये) अचूकपणे उल्लेख केलेला असणे आवश्यक आहे. अन्यथा, कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) अवैध होऊ शकते.

कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) अवैध आहे हे निश्चित करू शकणार्‍या त्रुटी

जेव्हा पुरवठादार बीजक (इनव्हॉइस) तयार करतो, तेव्हा त्यात त्रुटी असू शकतात. कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) हे अवैध होऊ शकते अशा काही त्रुटी आहेत:

 • अधिसूचित योजनेनुसार कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार केले जात नाही
 • बीजकामध्ये (इनव्हॉइसमध्ये) डुप्लिकेट IRN असणे
 • पुरवठादार किंवा प्राप्तकर्त्याचा अवैध जीएसटीआयएन (GSTIN) नमूद केलेला असणे
 • बीजका (इनव्हॉइस) हे कालमर्यादेत तयार केलेले नसते
 • पुरवठा केलेल्या वस्तू आणि सेवांबद्दल चुकीचे तपशील असणे

Also Read: Common Errors And Mistakes In Tax Invoices For Goods: Prevention And Correction

वैध नसलेले कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द न करण्याचे परिणाम

पुरवठादारांनी तयार केलेल्या कर बीजकांकडे (टॅक्स इनव्हॉइसेसकडे) लक्ष देणे आवश्यक आहे. प्राप्तकर्ता इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा चुकीच्या पद्धतीने दावा करण्यासाठी बीजकाचा (इनव्हॉइसचा) वापर करू शकतो. पुरवठादाराने एखाद्या व्यक्तीला फसवणूक करण्यास मदत केली आहे असे अधिकाऱ्यांना वाटू शकते. जेव्हा वस्तूंच्या वाहतुकीसाठी चुकीचे किंवा अवैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) वापरले जाते, तेव्हा अधिकारी वस्तू जप्त करू शकतात.

तुमचे कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द होण्याचे मुख्य कारण म्हणजे जीएसटी (GST non-compliance) अमान्यतेचे पालन न करणे. जेव्हा तुम्ही कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करता, तेव्हा तुम्हाला जीएसटी (GST) भरणे आवश्यक आहे. अवैध चलनासाठी जीएसटी (GST) भरण्याची गरज नाही. याशिवाय, आपण बीजक योग्य प्रकारे रद्द करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

जर अवैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) असूनही जीएसटी (GST) फॉर्मवर अपलोड केले असल्यास, त्यामुळे विसंगती निर्माण होऊ शकते. याचा अर्थ तुम्ही करचुकवेगिरी करण्याचा प्रयत्न करत आहात असा संशय अधिकाऱ्यांना येऊ शकतो. याचा परिणाम आर्थिक व्यव्हार तपासणी (ऑडिट) करण्यास सुरुवात होऊ शकते. कधीकधी, याचा परिणाम दंड देखील होऊ शकतो.

Also Read: What Are The Consequences Of Issuing An Invalid Tax Invoice For B2B Supplies?

वैध नसलेले कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करण्याचे फायदे

जर कर बीजकामध्ये (टॅक्स इनव्हॉइसमध्ये) चुका असल्यास, तुम्ही अवैध बीजक रद्द करणे आवश्यक आहे. हे फक्त तुमची कर दायित्व व्यवस्थापित करण्यातच मदत करत नाही तर मान्यता सुनिश्चित करण्यास देखील मदत करेल. कर बीजक (टॅक्स इनव्हॉइ) रद्द करण्याचे काही फायदे आहेत:

अचूकता आणि मान्यता सुनिश्चित करा व्यवसायिकांनी नेहमी त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या अचूक बीजके (इनव्हॉइसेस) आणि नोंदी ठेवणे आवश्यक आहेत. अवैध कर बीजके (टॅक्स इनव्हॉइसेस) रद्द केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचा अचूक रिपोर्ट मिळण्यास मदत होईल.

कमी केलेले कर दायित्व – अवैध बीजके रद्द केल्याने तुमचे जीएसटी (GST) दायित्व कमी होईल. जीएसटीच्या अधीन नसलेल्या व्यवहारांवर कर भरणे तुम्ही टाळू शकता.

परतावा (रिफंड) किंवा समायोजन (ॲडजेस्टमेंट) – प्राप्तकर्ते फक्त वैध कर बीजकासह (टॅक्स इनव्हॉइस) त्यांचे ITC (इनपुट टॅक्स क्रेडिट) योग्यरित्या व्यवस्थापित करू शकतात. वैध कर बीजके (टॅक्स इनव्हॉइसेस) रद्द केल्याने तुमच्या ग्राहकांना जीएसटी (GST) दंड टाळण्यास मदत होईल.

आर्थिक व्यव्हार तपासणी शोध (ऑडिट ट्रेल) – बीजके (इनव्हॉइसेस) रद्द करणे आणि रद्द केलेल्या बीजकांच्या (इनव्हॉइसेसच्या) अचूक नोंदी ठेवल्याने आर्थिक व्यव्हार तपासणीचा शोध घेण्यास (ऑडिट ट्रेल) सुरुवात होईल. अधिकाऱ्यांना तुमच्या जीएसटी (GST) फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास, ते आर्थिक व्यव्हार तपासणीचा शोधाद्वारे (ऑडिट ट्रेलद्वारे) अधिप्रमाणता आणि सत्यता त्वरीत सत्यापित करू शकतात.

योग्य बीजक (इनव्हॉइस) तयार करा – मानवच्या हातून चुका नेहमी घडतात. अवैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करून, तुम्ही योग्य बीजक (टॅक्स इनव्हॉइस) तयार करू शकता आणि सर्व योग्य तपशील नमूद करू शकता.

दंड देणे टाळा – जीएसटी (GST)-नोंदणीकृत व्यवसायिकांनी नेहमी मान्यता प्रदर्शित केले पाहिजे. अन्यथा, त्याचा परिणाम अनावश्यक दंड होऊ शकतो. अवैध कर बीजके (टॅक्स इनव्हॉइसेस) रद्द केल्याने तुम्हाला दंड टाळण्यास मदत होऊ शकते.

कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती

तुम्ही तुमच्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये एंटर केलेले बीजक तपशील सामान्यतः जीएसटी (GST) फॉर्ममध्ये ऑटो-पॉप्युलेट केलेले असतात. जर सॉफ्टवेअर ई-इनव्हॉइसिंग पोर्टलसोबत एकत्रीकृत केलेला असेल, तर बीजक तपशील सरळ ई-इनव्हॉइस तयार करण्यासाठी वापरला जाईल. म्हणून, जीएसटी (GST) कर बीजक तयार करण्यापूर्वी अचूकता सुनिश्चित करणे आणि सर्व बीजक तपशीलांची दोनदा तपासणी करणे महत्वाचे आहे. अद्याप वैध असलेले कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द करणे कसे टाळायचे याची देखील तुम्हाला जाणीव असणे आवश्यक आहे. वैध कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) रद्द केल्याने पुरवठादार आणि प्राप्तकर्त्यांसाठी जीएसटी (GST) मान्यता मध्ये समस्या निर्माण होतात. याचा परिणाम वैध परंतु रद्द केलेल्या बीजकांसह वाहतूक केलेल्या वस्तू जप्त करण्यात देखील होऊ शकतो.

तुमचे सर्व प्रयत्नांनतर देखील, चुका होऊ शकतात आणि ज्यामुळे तुमचे कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) अवैध ठरू शकते. अवैध बीजके (इनव्हॉइसेस) योग्य मार्गाने रद्द करणे आवश्यक आहेत. बीजक (इनव्हॉइस) रद्द करण्याच्या काही सर्वोत्तम पद्धती आहेत:

 • बीजक प्रत्यक्षात अवैध असल्याचे तपासा आणि रद्द करणे आवश्यक असल्याची पुष्टी करा
 • कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) कोणत्याही ई-वे बिलाशी संबंधित नसल्याचे सुनिश्चित करा
 • प्राप्तकर्त्याला बीजक (इनव्हॉइस) रद्द करण्याबद्दल सूचित करा
 • बीजक (इनव्हॉइस) योग्य मार्गाने रद्द करण्यासाठी IRP पोर्टल किंवा GST पोर्टलचा वापर करा
 • तुम्ही बीजक (इनव्हॉइस) योग्यरित्या रद्द केले आहे का ते व्यव्स्थितरित्या पुन्हा तपासा
 • बीजकामधील (इनव्हॉइसमधील) बदल प्रतिबिंबित करण्यासाठी तुमचे जीएसटी (GST) फॉर्म अपडेट करा
 • तुमच्या सिस्टममध्ये डिलीट केलेले आणि रद्द केलेले बीजक (इनव्हॉइस) हे योग्यरित्या रेकॉर्ड केले आहेत याची खात्री करा

निष्कर्ष

बीजकाच्या (इनव्हॉइसच्या) मॅन्युअल प्रक्रियेमुळे बऱ्याच त्रुटी येतील. ऑटोमेटेड बिलिंग साधने जीएसटी-मान्यता (GST-compliant) बीजक तयार करतात आणि मानवी त्रुटी कमी करतात. याशिवायदेखील, चुका होऊ शकतात आणि स्कीमा व फॉरमॅटचे पालन न केल्यास कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) अवैध होईल. जर तुम्ही बीजकातील (इनव्हॉइसमधील) चुका ओळखल्या ,तर तुम्ही जीएसटी (GST) पोर्टल वापरून त्यात सुधारणा करू शकता. अवैध बीजकांसाठी, तुम्ही बीजक (इनव्हॉइस) रद्द करणे आणि त्याऐवजी नवीन बीजक (इनव्हॉइस) तयार करणे आवश्यक आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या अचूकतेची खात्री केल्याने जीएसटी मान्यतेचे (GST compliance) पालन करण्यात मदत होईल.

तुम्हाला हाताळ्यासाठी तुमची व्यावसायिक कर बीजके (बिझनेस इनव्हॉइसेस) खूप गुंतगुंतीची वाटत आहेत का? CaptainBiz द्वारे जीएसटी GST बिलिंग प्रक्रिया ऑटोमेट करा. जीएसटी मान्यता (GST-compliant ) बीजक तयार करा, तुमच्या ग्राहकांना जारी करा, जीएसटी (GST) पोर्टलवर अपलोड करा, जीएसटी (GST) रिपोर्ट तयार करा आणि जीएसटी (GST) फॉर्म काही क्लिकद्वारे सिंगल इंटरफेस वापरून सबमिट करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

 1. बीजक (इनव्हॉइस) रद्द केल्याने पुरवठादाराच्या जीएसटी (GST) दायित्वावर परिणाम होतो का?

होय, प्रत्येक कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) जीएसटी (GST) निर्दिष्ट करते जो पुरवठादाराने सरकारकडे भरला पाहिजे. अवैध बीजकांमुळे (इनव्हॉइसद्वारे) GST दायित्वे देखील होतील. तुम्ही बीजके (इनव्हॉइसेस) रद्द केल्यास, तुम्हाला अवैध बीजकांसाठी (इनव्हॉइससाठी) जीएसटी (GST) भरण्याची गरज नाही. त्यामुळे लागणारा जीएसटी (GST) कर देखील बदलेल.

 1. बीजक (इनव्हॉइस) रद्द केल्याने प्राप्तकर्त्यावर कसा परिणाम होतो?

पुरवठादाराकडून कर बीजक (टॅक्स इनव्हॉइस) मिळवणारे प्राप्तकर्ते इनव्हॉइसवर आधारित इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) साठी दावा करू शकतात. हा इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) चा वापर ते GST कर भरण्यासाठी करु शकतात. त्यामुळे, ITC खरेदीदारांना त्यांचे कर दायित्व कमी करण्यास मदत होते. तुम्ही बीजक रद्द केल्यास, ते खरेदीदाराच्या जीएसटी (GST) फॉर्मवर देखील दिसून येईल. ते रद्द केलेल्या बीजकांवर ITC चा दावा करू शकणार नाहीत. यामुळे त्यांच्या जीएसटी (GST) दायित्वांमध्ये देखील बदल होईल.

 1. मी  बीजक (इनव्हॉइस) ऑनलाइन रद्द करू शकतो का?

जेव्हा तुम्ही ई-इनव्हॉइस तयार करण्यासाठी ई-इनव्हॉइसिंग पोर्टल वापरता, तेव्हा तुम्ही IRN किंवा बीजक क्रमांकासह IRP पोर्टल वापरून बीजक सहजपणे रद्द करू शकता. जेव्हा तुम्ही IRN तयार केल्यापासून 24 तासांच्या आत बीजक (इनव्हॉइस) रद्द करता तेव्हा हे शक्य होते. जर कालावधी संपला असेल आणि वेळ 24 तासांपेक्षा अधिक जास्त झाला असेल, तर तुम्ही बीजक रद्द करण्यासाठी GST पोर्टल वापरणे आवश्यक आहे. जर तुम्ही कर कालावधीसाठी जीएसटी (GST) रिटर्न सबमिट केले नसेल, तर याची परवानगी आहे. दोन्ही बाबतींमध्ये, तुम्ही ऑनलाइन हवे  तितके बीजके (इनव्हॉइसेस) डिलीट शकता.

 1. मी बीजक (इनव्हॉइस) ऑफलाइन रद्द करू शकतो का?

बीजक रद्द करण्यासाठी तुम्ही नेहमी इंटरनेटशी कनेक्ट असालच असे नसू शकते. तुम्ही बीजक (इनव्हॉइस) ऑफलाइन देखील डिलीट करु शकता. यात काही अतिरिक्त पायऱ्यांचा समावेश आहे. प्रथम, तुम्ही सर्व बीजकांसह जीएसटी (GST) पोर्टल वापरून JSON फाइल तयार करणे आवश्यक आहे. डेस्कटॉप टूल्स JSON फाइल वाचण्यासाठी आणि ती उघडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर तुम्ही एक एक करून किंवा मोठ्या प्रमाणात बिजके रद्द आणि डिलीट करु शकता. बीजक (इनव्हॉइस) रद्द केल्यानंतर, तुम्ही JSON फाइल अपडेट करणे आवश्यक आहे. जीएसटी (GST) पोर्टलवर, सर्व जीएसटी (GST) फॉर्मवर रद्दीकरण दिसून येत असल्याची खात्री करण्यासाठी ही JSON फाइल अपलोड करा.

 1. मी जुने बीजक रद्द करू शकतो का?

जर बीजकाच्या (इनव्हॉइसच्या )विरोधात पुरवठा केला गेला नाही, तर तुम्ही जुने 

बीजक (इनव्हॉइस) रद्द करू शकता. जीएसटी (GST) पोर्टल तुम्हाला जीएसटी (GST) रिटर्न भरण्यापूर्वी कोणत्याही आर्थिक कालावधीसाठी बीजक (इनव्हॉइस) रद्द करण्याची परवानगी देते. जर तुम्ही आधीच बीजक (इनव्हॉइस) पुरवठा केला असेल, तर तुम्ही बीजक (इनव्हॉइस) रद्द करू नये. त्याऐवजी, तुम्ही पुरवठादाराला सूचित केले पाहिजे आणि रद्द केलेल्या बीजकावर जीएसटी (GST) ऑफसेट करण्यासाठी क्रेडिट नोट तयार केली पाहिजे. जर तुम्ही आधीच जीएसटी (GST) रिटर्न सबमिट केले असतील परंतु तुमच्या रिटर्नमध्ये समाविष्ट केलेले बीजक रद्द करू इच्छित असाल, तर तुम्ही समान प्रक्रियेचे पालन केले पाहिजे.

author avatar
Niharika Kapoor Content Writer
Niharika is a Freelance Content Writer and Translator with a Master of Arts in Literature. She has 5+ years of working in the same and has worked in different industries.

Leave a Reply